Wednesday, July 7, 2010

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती

वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भीजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

नकोस थांबू पैलतटावर पुन्हा मांडु ये डाव पटावर
पुन्हा सावरु जरी बहरले अडसर अवतीभवती
लागले मन परतीच्या वाटेवरती

चुकले कोठे कधी कुणाचे या सा-याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

गीत - गुरु ठाकूर
संगीत - कौशल इनामदार
स्वर - जान्हवी प्रभू-अरोरा
अल्बम - जानवी

हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं

हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं
चुकून चुकलेल्या शब्दांनी बोलणं झालं माझं ………
काय करू ? अजुनही मी तिथेच आहे थांबुन
माझ्या डोक्यावर तसेच ढग ओथम्बुन …………
दुखाने भरलेले ………आठवणीने शाहारलेले……..

कितीदा वाटलं की आता असंच दूर जावं निघून खूप
जिथे तुझी सावलीही दिसणार नाही मला
आणि जिथे तुझा स्पर्श झालेला वाराही पोहोचणार नाही
पण झाले नाही असे कारन त्या क्षणीही माझा हात तुझ्या हातात होता
………………………………….

……. तुझ्या स्पर्शाने भारलेला

दूर जाताना तू माझा हात धरलास
जाऊ नकोस मला एकटा टाकुन डोळ्यात पाणी आणून म्हणालास
मी तशीच अजुन स्तब्धं त्याच वाटेवर तिथेच
माझा हात धरून तू उभा ………..आणि मी तुझ्याकडे बघताना
हतबल आणि ……….मी तशीच

- स्वरदा बुरसे………..

Thursday, July 1, 2010

आयुष्य म्हणजे :...........

आयुष्य म्हणजे :...........
एक संध्याकाळ,
४ मित्र ,
४ कप चहा,
१ टेबल .....................................................
आयुष्य म्हणजे :................
२ गाड्या ,
४ मित्र
सुट्टे पैसे
२०० रुपयाच पेट्रोल आणि एक मोकळा रस्ता........................................
आयुष्य म्हणजे :...............
एका मित्राचं घर
३raम ........हलका पावूस
आणि पत्ते ,.................................................................
आयुष्य म्हणजे :..................
शाळेतले मित्र
एक गल्ली आणि अर्धी संपलेली म्याच
तिखट एक डोसा आणि बिल वरून भांडण .............................
आयुष्य म्हणजे :...............
फोन उचलल्यावर मित्राची शिवी आणि एक धुळीत पडलेला फोटो अल्बम ..............
आयुष्य म्हणजे :.................
३० वर्षा नंतर एक पत्र ,
डोळ्यातले अश्रू आणि मित्राची एक हाक
..............

वेळ नाही

करार

मला खुपदा प्रश्न पडतो आयुष्य कसं असतं?

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा

कधीतरी असेही जगून बघा.....

कधीतरी असेही जगून बघा.....

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!


कधीतरी असेही जगून बघा.....
ही माझी पहिली कविता...
काही चुकले असल्यास सांभाळून घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो!

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी तासनतास आपलाच विचार
करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं....

कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं.......

शंभूराजे

ओढ

आकाशातला एक तारा

आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी....

तुझ्याविना

Saturday, June 19, 2010

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर


गुरू ठाकूर:

आता दोन दिवसांपूर्वी एक प्रसंग झालाय. माझी ””असे जगावे”” म्हणून एक कविता आहे. एका सोशल नेट्वर्किंग साईट वर, एका मुलीने लिहिले आहे की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमधे गेली होती आणि सगळ्यांना भीती होती की ती आत्महत्या करणार की काय. पण ही कविता तिच्या वाचनात आली आणि खूप फरक पडला तिच्यात आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि असे अनुभव वाचून मला वाचकांसाठी काहीतरी चांगलं लिहायची प्रेरणा मिळते,
मी माझ्या स्ट्रगलच्या काळात लिहिली होती ती कविता. मुळात मी भयंकर positive आहे . आयुष्य किती दु:खी आहे आणि मी कसा हालात आहे हेच का लिहायचं. माझ्याकडे पैसे नसायचे, स्ट्रगल चालू असायचा, कामं नसायची. तेव्हाही चेह-यावरचा ऊत्साह कायम तसाच असयचा बरेचदा विचारल जायचं की ””तू इतका स्ट्रगल करूनसुद्धा इतका आनंदी राहूच कसा शकतोस?””
उत्तर म्हणून तेव्हा मी चार ओळी लिहिल्या होत्या:

खिशास भोके सत्त्याहत्तर
तरी चेहरा हसरा आहे
माझ्यासाठी जगणे उत्सव
रोज दिवाळी दसरा आहे…

तेव्हा ह्या ओळी जणू माझी आयडेन्टिटी झाल्या होत्या. तसं पहायला गेलं तर ही माझी पहिलीच कविता असं आपण म्हणू शकतो.

!
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती
अंबर कवेत घेताना
हसू असावे ओठावरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करून जावे बरेच काही
दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-- गुरु ठाकूर

Thursday, June 3, 2010

असाच आहे मी चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा

असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला"



मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो ॥

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

मला मी सांगू असा वाटतो .....

कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो

मला मी सांगू असा वाटतो .....

रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
तरी सायंकाळी मी उरे इतुका एकटा
की एकांतही मजला एकटा सोडतो......

एकटेपण..

एकटेपण..
पाण्याच्या एकाच थेंबासारखं..

कधी पहाटेच्या दवाच्या टिपासारखं,रसिक,
धुक्याचा हात धरून अलगद पाकलिवर उतरनारं..

कधी हलवं,
भुईवर उतरताच तिच्या भेगाना जिरवता जिरवता स्वतःच जिरणारं..

कधी नादखुलं,
दिसेल त्या उतराच्यानादाला लागुन, डबक्यात अडकणारं..

कधी व्यवहारी,
मातीवर टेकताच समुद्राचा रस्ता शोधणारं...

कधी भाबड़,
पावसाच्या करंगलिला सोडून, उगाचच कुणाच्या खिडकिशी डोकावनारं..

कधी रागीट,
रागात येवून विजेच्या तारावर जिव जाईपर्यंत लोंबकालणारं..

कधी हसरं,
हजार थेंबासोबत खदखदून हसनारं,
पण, नेहेमीच, एकट..

वेड ते एकटेपण, आणि वेडा तो थेंब..
दोघात नातं एवढच की,
एकटेपणात साथ देतो,तो पापणीखालचा एकटाच थेंब..

साथ असली त्याची, तरी सोबत नसत मन
थेंब जातो सुकून, पण झोंबत राहातं, ते एकटेपण....

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !